चिचगड तालुका निर्मितीची जबाबदारी आता भाजपवर

0
30

सुरेश भदाडे
देवरी- विस्ताराने देवरी तालुका हा मोठा आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. यासाठी पुढारी, कार्यकर्ते, नेते,सामाजिक संस्थाच्या पदाधिकाèयांनी आंदोलने केली.
सध्या गोंदिया जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश होतो. देवरी हा तालुका विस्ताराने खूप मोठा आहे. त्यामुळे या तालुक्याचे विभाजन करून चिचगड तालुक्याची निर्मिती करावी, अशी अपेक्षा युवा भाजपचे आमदार संजय पुराम यांच्याकडून केली जात आहे.
१९९९ ला भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा मुख्यालय झाले असले तरी देवरीपासून हे अंतर शंभर किलोमीटर आहे. या तालुक्यातील बहुसंख्य गावे ही अरण्यव्याप्त व दुर्गम भागत आहेत. त्यांना गोंदिया गाठायचे म्हटले तर वेळ लागतो. चिचगड परिसरातील नागरिकांना कामासाठी देवरीला यायचे म्हटले तर त्यांचा संपूर्ण दिवस जातो. तसेच आर्थिक फटकाही सोसावा लागतो. यामुळे या भागातील जनता गेल्या अनेक वर्षापासून चिचगड हा स्वतंत्र तालुका व्हावा, अशी आशा बाळगून आहेत. या भागात अद्यापही एकही मोठा qसचन प्रकल्प साकारू शकला नाही. या भागात पर्यटनाला मोठा वाव आहे. विकासाच्या नावावर आजवर या भागातील नागरिकांना सर्वच राजकारण्यांनी आश्वासने दिलीत. मात्र, एकही प्रकल्प येथे सुरू झाला नाही.