राष्ट्रवादीचे संस्थापक तारिक अन्वर झाले काँग्रेसवासी

0
7

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.27ः – राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तारिक अन्वर यांनी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर काहीसे नाराज होत त्यांनी राजीनामा दिला होता. राफेल डील प्रकरणात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली. राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असे बोलून पवार साहेबांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचे तारिक अन्वर म्हणाले होते.