26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

0
20

कुरखेडा,दि.27ः- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातंर्गत येत असलेल्या पुराडा येथे सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी बारा वाजताचे सुमारास घडली .तुकाराम श्रीराम गहाणे ५०वर्षे असे मृतकाचे नाव असून ते आज सकाळी स्वतःच्या शेतावर धानाचे भारे बांधण्यासाठी गेले असता नऊ वाजताचे सुमारास त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यांना लगेच कुरखेडा येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तुकाराम गहाणे यांच्या आकस्मिक निधनाने पुराडा येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.