28.3 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home राजकीय खा.पटेलांच्या कार्यालयाला आमदार कु.हिना कावरेंची भेट

खा.पटेलांच्या कार्यालयाला आमदार कु.हिना कावरेंची भेट

0
25

गोंदिया,दि.12ः- मध्यप्रदेश विधानसभेच्या नवनियुक्त उपाध्यक्ष व शेजारील बालाघाट जिल्ह्यातील लांजी विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदार कु.हिना कावरे यांनी आज शनिवारला(दि.12) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व खासदार प्रफुल पटेल यांच्या कार्यालयाला भेट दिली.मध्यप्रदेश विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी निव़ड झाल्यानंतर त्यांचे गोंदियात प्रथमच आगमन झाले होते.त्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष कु.हिना कावरे यांनी पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्याशी राजकीय घडामोडीसह इतर विषयावर चर्चा केली.यावेळी लांजीच्या माजी आमदार श्रीमती पुष्पा कावरे,राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी राजू एन जैन,प्रभाकर दोनोडे,मयुर दरबार यांच्यासह इतर पदाधिदारी  सुध्दा उपस्थित होते.