प्रत्येक घरी सावित्रीबाई फुले घडवा- वर्षा पटेल

0
18

तुमसर,दि.12ः-मग्रामीण भागातील महिलांना ‘मुल आणि चुल’ सांभाळावे लागते होते. परंतु, स्पर्धात्मक जीवनात जीवन जगतांनी महिलांना होणाºया त्रासाला लक्षात घेवून महिलांना मिळालेल्या आरक्षणाचा फायदा आता खरा ठरला आहे. आताच्या महिला हया प्रत्येक पदावर पोहचल्या आहेत. याकरीताच प्रत्येक महिलांनी आपल्या घरी सावित्रीबाई फुले घडवावी तरच खरी महिलांची प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन स्व. मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी गोंदियाच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले आहे. खापा येथील राजकुमार माटे फाऊंडेशन यांच्या वतीने मैत्रीण महिला मंच व्दारा आयोजित ‘सन्मान महिलांना, सन्मान कर्तृत्वाचा तसेच क्रिडा व सांस्कृतीक महोत्सव’ या महिला मेळाव्याच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे तर प्रमुख पाहूणे म्हणून राकाँच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे, शिला डेकाटे, दुग्ध संघाच्या संचालिका रिता हलमारे, तुमसरच्या पं.स. उपसभापती सुप्रिया रहांगडाले, पमा ठाकुर, संगिता मुंगूसमारे, प्रतिक्षा कटरे, संगिता सोनवाने, मनिषा नागलवाडे, कुसूम कांबळे, शिशुकला पुंडे, सिमा रामटेके, सिमा बुरडे, मालिनी वहीले, पे्ररणा तुरकर व कार्यक्रमाच्या आयोजिका तथा जि.प. सदस्या गिता राजकुमार माटे आदी उपस्थित होत्या. वर्षा पटेल पुढे म्हणाल्या, गोंदिया जिल्हयात कॅन्सर रूग्णांच्या सेवेसाठी रिलायन्स कॅन्सर रूग्णालय सुरू करण्यात आले आहे.

माझ्या आई-बहिणींनी चार महिन्यानंतर निवडणूकांचा रणसंग्राम सुरू होणार असून चांगल्या व्यक्तीस निवडूण द्यावे, तुमच्या पाठिंब्याची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरज असून आमचा पक्ष सदैव तुमच्या पाठीशी उभा राहणार, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आम्रपाली बिसेन, हंसराज ठवकर तर आभार प्रदर्शन बारस्कर यांनी मानले. कार्यक्रमाला राजकुमार माटेफाऊंडेशन, शारदा नर्सिंग स्कुल, महिला बचत गट व गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.