अर्जुनी मोर नपच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय

0
13

अर्जनीमोरगांव,दि.28ः- येथील नगरपंचायतीच्या एका जागेकरीता झालेल्या पोटनिवडणूकीचा निकाल आज सोमवारला जाहिर झाला असून त्या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.शिवसैनिकांनी या विजयाचे श्रेय जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे,उपजिल्हाप्रमुख शैलेष जायस्वाल यांना दिले आहे. अर्जुनी मोरगाव तालुकामुख्यालय असलेली नगरपंचायत असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा मतदारसंघ आहे.पोटनिवडणुक झालेल्या जागेवर आदी भाजपचा सदस्य निवडून आलेला होता.मात्र काही महिन्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.या पोटनिवडणुकीत स्थानिक आमदार तथा फडणविस सरकारचे सामाजिक न्याय मंञी राजकुमार बडोले यांची निवडणूक यंत्रणा सपशेल फेल ठरवत अर्जनी मोरगांव नगरपंचायत वार्ड क्र.१४ च्या पोटनिवडणूकीत शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश ऊईके हे विजयी झाले. सामान्य शिवसैनिकांने मंञी महोदयांच्या बालेकिल्यातच सुरूंग लावत विजय संपादीत केल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड जल्लोशाचे वातावरण निर्माण झाले आहे.मंञी बडोलेंसाठी हा पराभव धक्का असल्याचे मानले जात आहे.