वंचित बहुजन आघाडीच्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर

0
11

मुंबई,दि.15ः- काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची घडी न बसल्याने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली आहे. ३७ उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात करून टाकली. एमआयएमने आधीच निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरीही त्यांना विश्वासात घेऊन मुंबईतील तीन जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आंबेडकर म्हणाले. तसेच, अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असे जाहिर केले.वंचित बहुजन आघाडीच्या यादीत उमेदवाराच्या नावापुढे त्याची जातही नमूद करण्यात आली आहे. सर्वच वंचित घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचे या यादीत पाहायला मिळते.

वंचित बहुजन आघाडीचे ३७ उमेदवार असेः

१. वर्धाः धनराज वंजारी
२. रामटेकः  किरण रोडगे-पाटनकर

३. भंडारा-गोंदियाः एन. के. नान्हे
४. गडचिरोली-चिमूरः डॉ. रमेश गजबे
५. चंद्रपूरः अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे
६. यवतमाळ-वाशिमः प्रो. प्रवीण पवार
७. बुलडाणाः बळीराम सिरस्कार
८. अमरावतीः गुणवंत देवपारे
९. हिंगोलीः मोहन राठोड
१०. नांदेडः प्रा. यशपाल भिंगे
११. परभणीः आलमगीर खान अखिल मोहम्मद खान
१२. बीडः प्रा. विष्णू जाधव
१३. उस्मानाबादः अर्जुन सलगर
१४. लातूरः राम गारकर
१५. जळगावः अंजली रत्नाकर बाविस्कर
१६. रावेरः नितीन कांडेलकर
१७. जालनाः डॉ. शरदचंद्र वानखेडे
१८. रायगडः सुमन कोळी
१९. पुणेः अनिल जाधव
२०. बारामतीः नवनाथ पडळकर
२१. माढाः अ‍ॅड. विजय मोरे
२२. सांगलीः जयसिंग शेंडगे
२३. साताराः सहदेव एवळे
२४. रत्नागिरी-सिंधुदुर्गः मारुती रामचंद्र जोशी
२५. कोल्हापूरः डॉ. अरुणा माळी
२६. हातकणंगलेः अस्लम बादशाहजी सय्यद
२७. नंदुरबारः दाजमल गजमल मोरे
२८. दिंडोरीः बापू केळू बर्डे
२९. नाशिकः पवन पवार
३०. पालघरः सुरेश अर्जुन पडवी
३१. भिवंडीः डॉ. ए. डी. सावंत
३२. ठाणेः मल्लिकार्जुन पुजारी
३३. मुंबई दक्षिणः डॉ. अनिल कुमार
३४. मुंबई दक्षिण मध्यः डॉ. संजय भोसले
३५. ईशान्य मुंबईः संभाजी शिवाजी काशीद
३६. मावळः राजाराम पाटील
३७. शिर्डीः डॉ. अरुण साबळे