मनोरुग्ण महिलेच्या पुनर्वसनासाठी गोटूलचा पुढाकार

0
14
सालेकसा,दि.14ः-तालुक्यातील गोटूल आदिवासी बहुउद्देशीय संस्था विविध सामाजिक कार्यामुळ नावारूपाला आली असून सालेकसातील सिंगलटोली गढमाता चौक परिसरात मागील 4 वर्षापासून 55 वर्षीय एका मनोरुग्ण महिलेच्या पुनवर्सनासाठी प्रयत्न केले आहे. मनोरुग्ण महिलेची व्यवस्था व्हावी यादृष्टीने गोटूल संस्थेच्या वतीने ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.ठाणेदारांनी सहकार्य करुन  ग्रामीण रुग्णालय सालेकसाकडून मनोरुग्ण असल्याबाबतची तपासणी करून घेण्यात आली.गोटुल आदिवासी बहुद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने त्या मनोरुग्ण महिलेला प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या समाजसेवी कार्यासाठी गोटू आदिवासी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वंदना रमेश भालाधरे, राहुल हटवार, पवन पाथोडे,  अमित वैद्य, ध्रुवकुमार हुकरे, गेंदलाल मडावी यांनी पुढाकार घेतला. या कार्याच्या यशस्वितेसाठी ठाणेदार राजकुमार डुणगे, डॉ. पी. एस. रामटेके, प्रकाश टेंभरे, पोलीस हवालदार संजय चौबे, सोनु परिहार यांनी विशेष सहकार्य केले.