शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांचा राजीनामा

0
11

चंद्रपूर,दि.21ः- लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारीची दावेदारी करणारे शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत मी लोकसभेसाठी सज्ज, असे उत्तर विरोधकांना दिले. चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल मुत्तेमवार यांचे नाव समोर येताच काँग्रेस गटात खळबळ उडाली होती नंतर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांनी पक्षश्रेष्ठीकडे मुत्तेमवारांच्या उमेदवारीचा विरोध दर्शविला, त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तात्काळ बैठक बोलावत चंद्रपूर लोकसभेसाठी कुणाचेही नाव जाहीर केले नाही.
काँग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार विजय वडेट्टीवार व आमदार बाळू धानोरकर यांची नावे चर्चेत होती परंतु ऐनवेळी मुत्तेमवार यांचे नाव समोर येताच चंद्रपूर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. आता आमदार बाळू धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा लढविण्याची पूर्ण तयारी केली आहे, काँग्रेस पक्षातर्फे त्यांना आधी राजीनामा द्या नंतर आपल्याला लोकसभा निवडणूकसाठी काँग्रेसकडून उमेदवारी देऊ, असे निर्देश दिल्याची माहिती विश्‍ववसनीय सूत्रांकडून मिळाली, आता ही लोकसभा निवडणूक अहिरांना कठीण जाणार कारण आता त्यांच्यासमोर बाळू धानोरकरांच तगडे आव्हान असणार आहे.राज्यात आणि केंद्रात सेना सत्तेत असूनही पूर्व विदर्भाच्या कार्यकर्त्यांना सेनेच्याच मंत्र्यांकडून अतिशय वाईट वागणूक दिली जाते ही खंत बाळू धानोरकर यांच्या मनात होती. त्यांनी अनेकदा ही खंत उघडपणे बोलूनही दाखवली होती. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत आपण एकट्याने किल्ला लढवला मात्र एकही मंत्री या ठिकाणी प्रचाराला न आल्याची खंतही त्यांनी नगरपरिषद निवडणुकी दरम्यान बोलून दाखवली होती.