41.9 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home राजकीय अखेर भंडारा लोकसभा मतदार संघात भाजपकडून सुनील मेंढे रिंगणात

अखेर भंडारा लोकसभा मतदार संघात भाजपकडून सुनील मेंढे रिंगणात

0
43

blank

गोंदिया,दि.24- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघातून भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे.त्य़ांच्या नावाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोल्हापूर येथील भाजप सेना युतीच्या पहिल्या जाहिर प्रचारसभेत करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.सोबतच माढा येथील उमेदवाराचीही घोषणा होणार आहे. परिणामी, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांचे नाव आता भाजपच्या यादीतून बाद झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे डॉ. फुके यांचे नाव भाजपकडून अपेक्षित असल्याने श्री. फुके यांनी मतदार संघात अप्रत्यक्षरीत्या संपर्क अभियानास सुरवात केली होती.तसेच त्यांच्यावर भंडारा-गोंदिया जिल्ह्याबाहेरील असा आरोप लावण्यात आला होता.मेंढे हे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही आपला पत्ता खुला केलेला नसल्याने अजूनही राष्ट्रवादीत शांतता पसरली आहे.