गोंदियात शिवसैनिकांनी काढली शिवजयंतीनिमित्त रॅली

0
21

गोंदिया,दि.24ः- गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करुन शहरात रॅली काढली. रॅलीचे नेतृत्व जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी केले.यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना मुकेश शिवहरे म्हणाले की शिवाजी महाराजांचा आदर्श आत्मसात केल्यास राज्यात खरे राज्य येईल असे उद्गार काढले.शिवसेना ही शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा पक्ष असून राजकारणासाठी नाही तर समाज कार्यासाठी आहे. शिवसेना  80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करून गोरगरिबांना न्याय देते, असेही शिवहरे म्हणाले.यावेळी उपजिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख,शहरप्रमुख,महिला आघाडी प्रमुखासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.आयोजनासाठी विधानसभा संगठक डिल्लु गुप्ता, ,तालुका प्रमुख अमर सिंह,संजु समशेरे,सुनिल सेंगर,राजू दोनोडे,आशिष चौहान,शुभम तुरकर,बापी लांजेवार, विधानसभा उपसंगठक चैनलाल रहांगडाले, उपतालुका संगठक नरेश मेश्राम, विधानसभा प्रमुख मुन्ना आस्वले, किशन दमाहे, राजेश लिल्हारे, पिंटू कटरे, उपतालुका प्रमुख लालचंद चिखलोंडे, बबलु लिल्हारे, नितेश जायसवाल, सुनील सहारे,आशु मक्कड़, गोलू दोहरे, विनीत मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.