राज्यात पहिला निकाल जाहीर, बारामतीहून सुप्रिया सुळे विजयी

0
26

पुणे,दि.23ःराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा बारामती मतदारसंघ सुप्रिया सुळे यांनी राखला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना तिकीट दिले होते. सुरूवातीला सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या तर कांचन कुल यांनी आघाडी घेतली होती. परंतु अखेर निकाल जाहीर झाला असून सुप्रिया सुळे यांनी विजयश्री खेचून आणली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना बारामतीची जागा दिली होती. जानकर यांनी रासपच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही सुप्रिया सुळेंना तगडी टक्कर दिली होती. जानकर जर कमळ चिन्हावर लढले असते तर निकाल वेगळा लागला असता असे काहींचे म्हणने होते. यावेळी भाजपने कुठलीच कसर न सोडता कमळच्या चिन्हावरच कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. परंतु निकाल सुप्रिया सुळेंच्या बाजूने लागला असून तब्बल दीड लाखहून अधिक मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला आहे.

१) बारामती विधानसभा मतदार संघ ः- २,३८,००० मतदान- कांचन कुल याना  ६०,००० तर सुप्रिया सुळेंना १,७०,०००
२) इंदापूर विधानसभा मतदारसंघः- १,९४,५७२, सौ.कुल – ८०,०००, सौ. सुळे – १,०५,०००
3) दौड विधानसभा मतदारसंघ ः-  १,८९,२१६, सौ. कुल – ९५,०००, सौ. सुळे – ८५,०००
४) पुरंदर विधानसभा मतदारसघः  २,१०,३९६, सौ. कुल – ८५,०००, सौ.सुळे – १,१५,०००
5) भोर विधानसभा मतदारसंघ ः- 
२,१५,७१९, सौ.कुल – ८५,०००,सौ.सुळे – १,१५,०००

६) खडकवासला विधानसभा मतदारसंघ  -२,५१,६०६,सौ.कुल – १,३५,०००,सौ. सुळे – १,०५,०००
एकूण मतदान – १२,९९,७९२, सौ कांचन कुल यांना ५,४०,००० तर सुप्रिया सुळे यांना ६,९५,००० मते मिळाली.