29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय प्रफुल्ल पटेल अडचणीत- ‘ईडी’ने बजावले समन्स

प्रफुल्ल पटेल अडचणीत- ‘ईडी’ने बजावले समन्स

0
35

blank

नवीदिल्ली,(न्यूज एजेंसी)- हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असे देखील न्यायालयाने म्हटले होते.
दीपक तलवारच्या अटकेनंतर प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी होणार, अशी शक्यता होती. अखेर शनिवारी ईडीच्या वकिलांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावल्याची माहिती दिली. ईडीने पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

blank