26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राजकीय काँग्रेस किसान आघाडीचे अध्यक्ष पटोले रविवारला गोंदियात

काँग्रेस किसान आघाडीचे अध्यक्ष पटोले रविवारला गोंदियात

0
18

गोंदिया,दि.20 : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे निवडणूक प्रचार प्रमुख नाना पटोले उद्या(दि.२१) रविवारी गोंदिया जिल्ह्या्च्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता तिरोडा येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी १ वाजता गोंदिया तालुक्यात दुष्काळाची पाहणी करून गोंदिया येथील विश्रामगृहात शेतकरी आणि पक्ष पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. दीड वाजता शहीद भोला भवन येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून दुपारी साडेतीन वाजता गोरेगाव, पाच वाजता सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्यासोबर आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे, प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.