28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home राजकीय प्रियंका गांधीच्या अटकेच्या निषेधार्थ जयस्तंभ चौकात काँग्रेसची निदर्शने

प्रियंका गांधीच्या अटकेच्या निषेधार्थ जयस्तंभ चौकात काँग्रेसची निदर्शने

0
24

गोंदिया,दि.20: अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याच्या निषेधार्थ आज शनिवारला  शहर जिल्हा काँग्रेसतर्फे जयस्तंभ चौकात निषेध नोंदविण्यात आला.उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार करून १० जणांची हत्या करण्यात आली. या हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी सोनभद्र येथे जात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस तथा उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांना वाराणसी पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली. याची वार्ता काँग्रेस कार्यकर्त्यांना कळताच देशभरात प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जिल्हा व शहर काँग्रेसने रस्त्यावर उतरत भाजप सरकारच्या दडपशाही तीव्र निषेध नोंदविला. भाजप सरकारच्या कृतीविरोधात तीव्र घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. आंदोलनात प्रदेश काँग्रेस सचिव अमर वराडे,जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,शहर काँग्रेस अध्यक्ष चौधरी,युवक काँग्रेस नेते प्रफुल अग्रवाल,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले,आलोक मोहंती,रत्नदिप दहिवले,पृथ्वीपालसिंह गुलाटी,संजय दोनोडे  यांच्यासह पदाधिकारी व कार्यक़र्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते