माॅब लिचिंगच्या विरोधात शहरात मोर्चा

0
12

गोंदिया,दि.20ः माॅब लिचिंगच्या विरोधात भारतीय भाईचारा कमिटीच्यावतीने शहरात आज शनिवारला ईदगाह मैदानातून मोर्चा काढण्यात आला.त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी मोर्च्याचे सभेत रुपांतर झाले.माॅब लिचिंग,रोहित वेमुल्ला प्रकरण व झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांसह ओबीसी एससी एसटी बहूजन संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
झारखंड येथील तरबेज अन्सारी यांची माॅब लिचिंगमध्ये समाजकंटकांनी हत्या केली.अशा घटना सातत्याने घडत आहेत. याविरोधात कडक कायद्याची गरज आहे. यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी पप्पू मंडळ व त्यांच्या साथीदारांना त्वरित अटक करण्यात यावी.अल्पसंख्यांकासाठी सुरक्षा म्हणून कायदा करण्यात यावा दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे. वायलेंस प्रिव्हेन्र्शन ॲक्ट फाॅर मायनाॅरिटी निर्माण करण्यात यावे आदि मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.यावेळी भारतीय भाईचारा कमिटीचे प्रमुख गुड्डु हुसैनी, संविधान मैत्री संघाचे डी.एस.मेश्राम,पौर्णिमाताई नागदेवे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलाश भेलावे, शिव नागपुरे,युवा बहुजन मंचचे सुनिल भोंगाडे, रवि भांडारकर, शुभम अहाके, फिरदोस खान, आलिशा खान, सायमा खान, बबिता भालाधरे आभा मेश्राम, माया मेश्राम, गौतमा चिचखेडे, प्रजापति सहारे,देवेश शेंडे,भाकपचे मिलिंद गणवीर आदि उपस्थित होते.