मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी दादरच्या सावरकर राष्ट्रीय स्मारकास तसेच शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळालाही भेट देऊन अभिवादन केले.
चैत्यभूमी परिसराचे सुशोभिकरण कालबद्ध पद्धतीने करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. हे काम जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या वेळी मंत्रिमंडळातील सदस्य विनोद तावडे, प्रकाश मेहता, पंकजा मुंडे, विद्या ठाकूर, दिलीप कांबळे तसेच आमदार आशिष शेलार, मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.
वाढदिवसाच्या शुभेच्छा