गोंदिया,दि.०६ः-भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या परवानगीने भारीप बहुजन महासंघ व वंचित आघाडीच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार यांची निवड केल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष प्रा.अशोक सोनोने यांनी दिले आहे.त्यांनी सोबतच जिल्ह्याची कार्यकारीणी सुध्दा जाहिर केली.त्यामध्ये महासचिव जनार्धन बनकर,कोषाध्यक्ष मेघराज पंधरे,संघटक राजू डहाट,सहसघंटक इशांत मस्के,उपाध्यक्ष विनोद मेश्राम,आशिष बनोटे,ईशुलाल नगरे,सौ.किरण फुले,सुनिता भालाधरे,रेखा टेंभुर्णीकर,qबदू मेश्राम,सविता मेश्राम,नलूबाई खोब्रागडे,सहसचिव विष्णु नागरीकर,सचिव प्रमोद खिरेकर,राजू राहुलकर,मनोज चव्हाण,महेंद्र मेश्राम,समसुल पठाण,तर सदस्यामध्येै महेंद्र मेश्राम,साधना कोटांगले,कृष्णा खोब्रागडे,सिध्दार्थ हुमणे,आकाश साखरे,ललित भैसारे व संदिप नंदागवळी यांचा समावेश आहे.





