गडचिरोली,दि.६: अतिवृ्ष्टीमुळे आलेल्या पुरात दोन नागरिक वाहून गेले.त्यामध्ये धानोरा तालुक्यातील निमगाव येथील रामदास मादगू उसेंडी आरमोरी तालुक्यातील मेंढा येथील नाल्याच्या पुरात सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वाहून गेला तर चामोर्शी तालुक्यातील पाविलसनपेठा येथील सुधाकर पोटावी हा इसम पोरनदीत वाहून गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. ठाणेगाव येथील १६ व अरततोंडी येथील शंभर जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिसांना यश आले आहे.देसाईगज तालुक्यात जुन्या अरकतोंडी गावाला चारही बाजुने गाढवी नदीच्या पुराने वेढल्याने पुरपरिस्थिती गंभीर झाल्याची माहिती मिळाल्यावर देसाईगंज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप लांडे आपल्या पथकासह त्या गावात पोहचले. तब्बल चार तासाचे अभियान राबवुन शंभर गावक-याना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.तर आरमोरी पोलिस ठाणेंतर्गत ठाणेगाव येथे शेतात कामाला गेलेले 25 कामगार हे खोब्रागडी नदीला आलेल्या पुरामुळे अडकल्याचे कळताच आरमोरीचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी पोलिस निरिक्षक सुर्यवंशी यांच्याशी समन्वय साधत रेस्कुटिमच्या माध्यमातून त्यांची सुटका केली.
मागील पाच दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद झाले असून, हजारो गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे, तर अनेक ठिकाणी ये-जा करणारे नागरिक अडकून पडले आहेत. अनेक गावांमध्ये शेकडो घरे क्षतिग्रस्त् झाली आहेत. गडचिरोली-नागपूर मार्ग बंद झाला आहे.दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे १९दरवाजे दीडमीटरने, तर १४ दरवाजे १ मीटरनेउघडण्यात आले असून, त्यातून ९२३४क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे.गोगावनजीकच्या पाल नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली-नागपूर मार्ग, तसेच शिवणी नाल्यावर पूर असल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गही बंद झाला आहे.
कुरखेडा-वैरागड-रांगी, आलापल्ली-भामरागड, कमलापूर-रेपनपल्ली, आरमोरी-देसाईगंज, शंकरपूर-बोडधा, फरी-किन्हाळा, एटापल्ली-आलापल्ली, भामरागड-लाहेरी, चातगाव-पेंढरी, मानापूर-पिसेवडधा, हल्दी-डोंगरगाव, कोरची-बोटेकसा, धानोरा-मालेवाडा, चोप-कोरेगाव, वैरागड-वासाळा हे मार्ग बंद झाले आहेत. सिरोंचा तालुक्यातील मोसम गावाजवळ पुरामुळे वाहतूक ठप्प् झाली आहे. कुरखेडा-वैरागड मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मोसम-नंदीगाव-झिमेला नाल्यावर पाणी असल्याने दोन्ही बाजूंना वाहने अडकली आहेत. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे मध्यरात्री पुराचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मदत कार्य करीत आहे. वैरागड येथे २० हून अधिक घरे क्षतिग्रस्त झाली आहेत. हीच स्थिती अनेक खेड्यांमध्येही आहे.
नागपूर जिल्ह्यात दिवसभर पावसाचा जोर कायम आहे कुही तालुक्यातील धामणा गावात काही घरात पाणी शिरले आहे. वेलतुर बोरी रस्त्यावरील तारणा नदीवर पूल असल्याने या मार्गाची वाहतूक विस्कळीत आहे. खापा सावनेर मार्गावरील कन्हान नदीला पूर आल्याने या मार्गावरची सुद्धा वाहतूक विस्कळीत आहे.




