30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय रामटेकमध्ये शिवसेनेचे अ‍ॅड. आशिष जयस्वाल लढवणार अपक्ष निवडणूक

रामटेकमध्ये शिवसेनेचे अ‍ॅड. आशिष जयस्वाल लढवणार अपक्ष निवडणूक

0
38

नागपूर,दि.03: आपला भाजप-सेना नेतृत्वावर कुठलाच राग नसल्याचे स्पष्ट करून अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मिडियावर टाकलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी, मला उमेदवारी न मिळाल्याने मी अजिबात नाराज नाही. पक्षश्रेष्ठींना त्यांच्या राजकीय अडचणी असू शकतात. मीच उमेदवार राहिलो पाहिजे, अशी माझी भावना नाही. मी युतीच्या नेत्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. ५ वर्ष माझ्या कार्यकत्यांसोबत द्वेषाने व सूड भावनेने वागणाऱ्या उमेदवाराचा मी प्रचार करू शकणार नाही, त्यामुळे उद्या शुक्रवारी मी अपक्ष निवडणुकीचा अर्ज सादर करणार आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया येथेही शिवसेनेच्या नाराज उमेदवारांच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार असल्याची समोर आली आहे.