तिरोडा,दि,१४- भाजपचे सरकार हे भाड्याचे सरकार आहे. धान-कापूस वा सिंचनावर कोणीही बोलायला तयार नाहीत. युवकांच्या बेरोजगारीवर बोलणार नाही. याउलट शेतकरी माजले साले आणि दारूच्या बाटलीला बाईचे नाव द्या म्हणणाèयांना तिकीट दिले जाते तर खडसे, तावडे आणि बावनकुळे सारख्या निष्ठावंत बहुजनांचे तिकीट कापले जाते. यामुळे बहुजन शेतकèयांनी शेतकरी माजलाय म्हणणाèयाचा माज आता उतरवलाट पाहिजे, आवाहन राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी तिरोडा येथे आज (दि.१४) उपस्थित मतदारांना केले
ते तिरोडा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस रिपाई महाआघाडीचे उमेदवार रविकांत(गुड्डू)बोपचे यांच्या प्रचाराकरिता आयोजित प्रचार सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आज भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. शासकीय यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करून सत्ता हस्तगत करण्याचे षडयंत्र आखले जात आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी पवार साहेबांशी दगा करणारे या निवडणुकीत सपाट होतील. कर्तव्य शून्यता असल्याने त्यांनी सत्ताकाळात काय केले सांगणे सोडून ३७० चे तुणतुणे वाजवत फिरत आहेत. पोलिस भरती आणि नोकरभरतीवर ते काही बोलायलाच तयार नाही. संगणकचालक आणि अंगणवाडीसेविकांचे काय झाले, ते सांगत नाही. हुजरेगिरी करणाèयांना तिकीट वाटले गेले. तर प्रामाणिक बहुजन नेत्यांचे तिकीट कापून त्यांना संपविण्याचे मनसुबे आखले जात आहेत. शेतकèयांना शिव्या हासडणाèयासह दारूच्या बाटलीला बाईचे नाव द्या म्हणणाèया गिरीश महाजन यासारख्यांना तिकीट दिले जाते. मात्र, प्रामाणिकपणे काम करणाèया आणि मुख्यमंत्री पदाला पात्र असलेले खडसे, चंद्रशेखर बावनकुळे सारख्या बहुजन नेत्यांना घरी बसविले जाते.शिवसेनेचा युवा नेता एसीत बसणार सुरक्षित मतदारसंघ शोधत आहे. एकीकडे शिवरायांचे गडकिल्ले भाड्याने देतात. तर दुसरीकडे मात्र शिवाजींचा अपमान करणायाला पुरस्कार दिले जात. देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना मोदी फडणवीस काय करतात ते कोणी सांगायला तयार नाही.
यावेळी प्रदेश महिला अध्यक्ष रुपाली चाकरणकर,माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,माजी आमदार राजेंद्र जैन,जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,काँग्रेस उपाध्यक्ष पी.जी.कटरे,प्रदेश सचिव डॉ.योगेंद्र भगत,महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,राधेलाल पटले,प्रेम रहागंडाले,ममता बैस,नीता रहागंडाले,कैलास पटले,नरेश कुंभारे,डेमेंद्र चव्हाण,राजकुमार केशवानी,अजयqसह गौर,सुनिता मडावी,जिब्राईल पठाण,केतन तुरकर,प्रदिप रोकडे,रुबीना मोतीवाला,केवल बघेले,जगण धुर्वे,संध्या गजभिये,डॉ.अविनाश जायस्वाल,जगदिश कटरे,डॉ.किशोर पारधी,सुधीर वासनिक,प्रशांत डहाटे,रामकुमार असाटी,गजानन बारापात्रे,राजकुमार एन.जैन,राजकुमार भेलावे,रोशन बडगे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिटकरी म्हणाले की,राष्ट्रवादीचे कित्येक नेते गेले,मात्र मी राज्यात फिरतोय,तरुणांचे पाठबळ राष्ट्रवादीच्या मागे मोठ्या संख्येने आहे.हे तरुणांचे पाठबळ भाजपकडे नाही.त्यामुळे उद्याची सरकार राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीची असेल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मागील ५ वर्षापासून जास्त जातीय तणाव भाजप सरकारच्या काळात झालेला दिसतोय,हे मी बोलत नाही तर संबधित खात्याचा अहवाल बोलतो असे म्हणाले.
यावेळी बोलतांना रुपाली चाकणकर म्हणाल्या की,राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलावंर सर्वाधिक अन्याय अत्याचार झाले असून मुख्यमंत्र्याच्या नागपूरात महिलांवर अत्याचाराचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे सांगितले.सोबतच महिला पोलिस अधिकारी कर्मचारीवर अन्याय अत्याचर करणारे यांच्याच पक्षाचे लोक असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ.योगेंद्र भगत यांनी तर जोरदार हल्ला भाजपसरकार करीत या सरकारने सर्व शेतकरीबांधवाची कर्जमाफीच्या नावे घोर फसवणूक केल्याची टिका केली.शेतकरी आत्महत्या करु लागलेत तर जिल्ह्यात व मतदारसंघात रोजगाराची एकही संधी उपलब्ध झालेली नाही.विरोधी पक्षाचा उमेदवाराचा भाऊ ज्या जागृती पतसंस्थेचा पदाधिकारी आहे,त्या पतसंस्थेच्या सभासदांनाही विचारा की ते कितपत सुरक्षित आहेत अशा सवाल त्यांनी उपस्थित केला.ही निवडणुक देशाची नव्हे तर राज्याची आहे जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या मुद्यांची असल्याने कुणाच्याही भुलथापांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या निवडणुक चिन्हावर बटन दाबून आघाडीची शक्ती दाखविण्याची ही संधी गमावणे आपल्या सर्वांना भविष्यात महागडे ठरणार असल्याचे भगत म्हणाले.
यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी अपक्ष उमेदवारावर जोरदार हल्ला करीत ज्यांना आम्ही आजपर्यंत सहकार्य करीत आलो.ज्यांना पक्षाने मोठमोठी पदे दिली मानसन्मान दिला त्यांच्यामुळेच २००९,२०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला.सातत्याने पक्षाच्या पराभव करण्यासाठी काम करणाèया व्यक्तीसोबंत राहून पक्षाचे नुकसान कुणी करु नये शरद पवार व प्रफुल पटेलांचे हात मजबुत करण्यासाठी पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी पी.जी.कटरे,पंचम बिसेन यांच्यासह अनेकांनी विचार व्यक्त केले.संचालन डॉ.अविनाश जायस्वाल यांनी केले.




