गोंदिया,दि. १४ : गोंदिया विधानसभा निवडणूकीत भाजप-सेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवाराच्या विरोधात काम करीत असल्याचे निदर्शनास आलेल्या भाजपच्या १२ लोकप्रतिनिधींना तत्काळ स्पष्टीकरण देण्याची नोटीस भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी आज, १४ ऑक्टोबर रोजी बजावली आहे. यात जिप सभापती शैलजा सोनवाने, जिप सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, जिप सदस्य शामकला पाचे, गोंदिया नप उपाध्यक्ष शिव शर्मा, नप सभापती धर्मेश (बेबी) अग्रवाल, नप गटनेता घनश्याम पानतावने, नप सदस्य दीपक बोबडे, विमला मानकर, पंस सदस्य विमल पटले, पंस सदस्य ममता वाढवे, पंस सदस्य दीपा चंद्रीकापुरे व पंस सदस्य शंकर नारनवरे यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी दिली आहे. तसेच तत्काळ स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.




