गडचिरोली,दि.23ःभारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खा. अशोक नेते यांची अनुसूचित जाती तथा अनुसूचित जमातीच्या कल्याण संबंधी स्थायी समिती भारत सरकारच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीद्वारा भारत सरकार एससी व एसटी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या उत्थानासाठी विविध उपक्रम व योजना राबवून त्या योजनांची अंमलबजावणी झाली किंवा नाही तसेच त्याचा प्रत्यक्ष लाभ या समाजाला मिळाला किंवा नाही याची माहिती जाणून घेणे केंद्र सरकारला सोयीचे होणार आहे. तसेच प्रशासकीय यंत्रणा केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करते किंवा नाही याची माहितीही समिती जाणून घेणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षण व इतर सवलतीबाबत या समितीत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे.
खा. अशोक नेते यांची या समितीवर नियुक्ती झाल्याने गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रातील एससी व एसटी समाजाच्या अडी-अडचणी, महत्त्वाचे प्रश्न केंद्र स्तरावर सोडविणे सोयीस्कर झाले आहे. भारत सरकारच्या अनुसूचित जाती, जमाती कल्याण संबंधी संसदीय समितीच्या सदस्य पदावर खा. नेते यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे प्रदेश सदस्य तथा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रदेश सदस्य तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम, डॉ. देवराव होळी, कृष्णाजी गजबे, कीर्तीकुमार भांगडिया, संजय पुराम, माजी आ. प्रा. अतुल देशकर, जि.प. अध्यक्षा योगीताताई भांडेकर, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्षा शालूताई दंडवते, भाजपचे प्रदेश सदस्य तथा जि.प. कृषी सभापती नाना नाकाडे, सहकार महर्षी तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, ज्येष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री डॉ. भारत खटी, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे, सदानंद कुथे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, डी. के. मेर्शाम, स्वप्नील वरघंटे, संजय बारापात्रे, गडचिरोली तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, चामोर्शीचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, धानोराचे तालुकाध्यक्ष शशीकांत साळवे, सुधाकरराव यनगंधलवार, न.प. उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, मोतीलाल कुकरेजा तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.





