गोंदिया दि. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. या निवडणूकीची मतमोजणी आज 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून होणार आहे. चारही मतदारसंघात एकूण 62 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी 233 अधिकारी-कर्मचारी राहणार असून यामध्ये राखीव कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
अर्जनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अर्जुनी/मोरगाव येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या वखार महामंडळाच्या गोदाम क्र.3 येथे, तिरोडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया रोड तिरोडा येथे, गोंदिया विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी मरारटोली रोडवरील नवीन जिल्हा क्रीडा संकुल येथे आणि आमगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे होणार आहे.
मतमोजणीसाठी एकूण 62 टेबल राहणार असून 75 पर्यवेक्षक, 75 पर्यवेक्षक सहाय्यक, 83 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 233 अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 14 टेबलवर होणार असून यासाठी 17 पर्यवेक्षक, 17पर्यवेक्षक सहाय्यक आणि 19 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 53 अधिकारी-कर्मचारी, तिरोडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 14 टेबलवर होणार असून यासाठी 17 पर्यवेक्षक, 17पर्यवेक्षक सहाय्यक आणि 19 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 53 अधिकारी-कर्मचारी, गोंदिया विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 20 टेबलवर होणार आहे. यासाठी 24 पर्यवेक्षक, 24 पर्यवेक्षक सहाय्यक आणि 26 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 74 अधिकारी-कर्मचारी आणि आमगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 14 टेबलवर होणार असून यासाठी 17 पर्यवेक्षक, 17पर्यवेक्षक सहाय्यक आणि 19 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 53 अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत.





