भंडारा- भाजपाने तिकीट नाकारल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात राहिलेले व पराभूत झालेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी भंडारा जिल्हा विकास आघाडीची स्थापना करून त्याद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. या निवडणुकीतून चरण वाघमारे हे भावी राजकारणाचे qकग मेकर बनणार असल्याची चर्चा आहे. तुमसर-मोहाडी क्षेत्राचे भाजपाचे आमदार बनताच चरण वाघमारे यांनी मुंबई येथील आमदार निवास व उंदिर घोटाळा उघडकीस आणला होता. तेव्हापासून ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांना असलेल्या शासकीय नियमांच्या माहितीचा वापर करून त्यांनी त्यांच्या क्षेत्रात भरपूर विकासात्मक कामे केली. मात्र असे करत असतांना त्यांना पक्षातच बंडेखारीचा सामना करावा लागला.
तुमसर येथील नगरसेवकांकडे विद्यमान नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे हे दुर्लक्ष करीत असल्याचेकळताच ते नगरसेवकांच्या हितासाठी धावून आले. यामुळे प्रदीप पडोळे डिवचल्या गेले. विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके हे बाहेरचे असल्याने त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये असे म्हणून त्यांच्या उमेदवारीला चरण वाघमारे यांनी विरोध केला. परिणामतः परिणय फुके यांनीही चरण वाघमारे यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न केला, अशी चर्चा आहे. शेवटच्या क्षणी विरोधकांनी आखलेल्या रणनितीमुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले.
परिणामतः चरण वाघमारे यांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही. तरीसुद्धा बंडखोरी करीत चरण वाघमारे यांनी निवडणूक लढविली. भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त मते घेऊन अवघ्या काही मताने त्यांचा पराभूत झाला. एवढेच नव्हे त्यांचा फटका भंडारा व साकोली येथील उमेदवारांनाही बसला. अपक्ष निवडणूक लढवित असतांना त्यांच्या मागे असलेले भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तुमसर व मोहाडी येथील नगरसेवक तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील इतर नेत्यांचा पाठींबा पाहता आता त्यांनी नवीन संघटना उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भविष्यात चरण वाघमारे हे भाजपला जड होतील, अशी काही भाजप पदाधिकाèयांची ईच्छा असल्याने त्यांना पुन्हा पक्षात घेवून मानाचे पद द्यावे, अशी मागणी भाजप पदाधिकाèयांनी केली आहे. चरण वाघमारे यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळेल, अशीही चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. मात्र चरण वाघमारे यांनी भंडारा जिल्हा विकास आघाडी स्थापन करून आपले स्वतंत्र नेतृत्व उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ महिन्यात जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. यासाठी आताच डावपेच आखून ह्या निवडणुका जिल्हा विकास आघाडीच्या नावावर लढण्याचा निर्णय चरण वाघमारे यांनी घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काही पदाधिकाèयांची बैठक सुद्धा घेतली असल्याची चर्चा आहे.





