NCPच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे

0
6

मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांची एकमताने निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार त्यांचे एक महिन्याचे वेतन नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी देणार असल्याचे माहिती ज्येष्ठ नेते आणि आमदार अजित पवार यांनी माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनील तटकरे यांच्या नावाचा बैठकीत प्रस्ताव मांडला. त्यावर विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी तटकरेंच्या नावाला अनुमोदन दिले आहे.