भाजप शासनाने घोषणेशिवाय काहीच केले नाही-माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

0
16

गोंदिया दि.१-भाजप शासनातर्फे आत्तापर्यंत फक्त घोषणाच करण्यात आल्या. मात्र त्यावर कसल्याच प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नाही. याउलट शासनस्तरावर घेण्यात आलेले अनेक निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचेही नाहीत. तर भाजप सरकार सर्वसामान्यांची सरकार नसून उद्योगपतींची सरकार असल्याचा आरोप कॉग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार माणिकराव ठाकरे यांनी केंद्र व राज्य शासनावर केला आहे. ते गोंदिया येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
येत्या जिप व पंस. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कॉग्रेस पक्षातर्फे आयोजित आढावा बैठकीत उपस्थित राहण्यासाठी ते जिल्ह्याच्या दौèयावर आले होते. दरम्यान त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. येणाèया जिप व पस निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षासोबत युती विषयी विचारणा केली असता ते म्हणाले की जिप व पंस निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कार्यकत्र्यांच्या भूमिकेवरून युती होणार qकवा नाही हे स्पष्ट होते. दरम्यान ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार असून अद्याप राष्ट्रवादी पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही.प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल. यावेळी भूमी अधिग्रहण कायद्यावर बोलताना ते म्हणाले की हे बिल शेतकèयांवर अन्याय करणारे असेच आहे. काँग्रस शासनाच्या काळात उ़घोेगपतींच्या हातात जमीन जाऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली होती. मात्र केंद्र सरकार शेतकèयांच्या विरोधाची असून राक्षसी प्रवृत्तीला साथ देत असल्याचे ते म्हणाले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर आम्ही मते मागितली नसून भाजपने ही जबाबदारी स्वीकारून वेगळा विदर्भ राज्यासाठी पुढे आले पाहिजे.ठाकरे म्हणाले की, येत्या निवडणुकांना बघून भाजप सरकारने बोनस जाहीर केले. मात्र ही त्यांची फसवी घोषणा आहे. हे सरकार शेतकèयांच सरकार नसून फक्त गुजरातच्या उद्योगपती व भांडवलदारांचे सरकार असल्याचे आतापर्यंत काळातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जनतेचा कल आता कॉंग्रेसच्या बाजूने असल्याचा विश्वास व्यक्त केला. जनतेचा हा कौल बघूनच जिल्हा परिषद निवडणुकांना बघता प्रचाराचा वेग वाढविला आहे. त्यातच येत्या ८ जून रोजी पुन्हा जिल्ह्यात येणार असून मतदारसंघनिहाय बैठका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे स्वतंत्र वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले. निवडणुकीच्या वेळी वेगळ्या विदर्भाच्या गोष्टी करणारे आता मात्र काहीच बोलत नसल्याचे सांगत त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. तर त्यांच्या प्रत्येक शब्दात खोटारडेपणा असल्याचे सांगत नैतिकतेच्या आधारावर पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. याप्रसंगी कॉंग्रेसचे प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून नियुक्त जिल्हा प्रभारी कृष्णकुमार पांडे व आ.गोपालदास अग्रवाल उपस्थित होते.