बीड : जिथपर्यंत माणसे राहतात तिथपर्यंत रस्ता नेण्यासाठी व एकूणच रस्ते विकासासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे केली.
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह महिला व बालविकासअंतर्गत “बालआधार‘ योजना राबविणार आहोत. राज्यात 91 हजार 454 बालके निराधार असून, ती एक हजारांपेक्षा जास्त खासगी व 41 शासकीय संस्थांमध्ये आहेत. त्यांना आधार देण्यासाठी “बालआधार‘ योजना आहे. लवकरच प्रायोगिक तत्त्वावर एका बालकाला “बालआधार‘ योजनेचे कार्ड देऊन जिल्ह्यापासूनच या “बालआधार‘ योजनेचा प्रारंभ करणार आहे.