राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 25 ते 28 नोव्हेंबरदरम्यान

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 25 ते 28 नोव्हेंबरदरम्यान होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पुणे शहरातून ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असून, सार्वजनिक बांधकाम अथवा ऊर्जा मंत्रालय असे महत्त्वाचे खाते दिले जाणार आहे. माधुरी मिसाळ यांना तसेच बाळा भेगडे किंवा बाबूराव पाचर्णे यांच्यापैकी एकाला राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे.
गिरीश बापट यांच्याकडे पालक मंत्रिपद; तसेच “पीएमआरडीए‘चे अध्यक्षपद येणार आहे. सर्वांत ज्येष्ठ, कार्यक्षम आमदार म्हणून गिरीश बापट यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा, तर रा. स्व. संघाचा आशीर्वाद असल्यामुळे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची निवड होणार आहे. महाराष्ट्रातून अनेक गडकरी समर्थकांनाही न्याय मिळणार आहे. विदर्भातून डॉ. संजय कुटे, कृष्णा खोपडे, अनिल सोले, मदन येरवारे, चंद्रकांत बावनकुळे ,राजकुमार बडोले,इत्यादींची नावे स्पर्धेत आहेत. चैनसुख संचेती यांनाही संधी मिळणार आहे. नाशिकमधून राहुल आहेर अथवा देवयानी फरांदे, धुळ्यातून जयकुमार रावळ, सोलापूरमधून सुभाष देशमुख, विजय देशमुख, मुंबईतून आशिष शेलार, राज के. पुरोहित, शायना एन्सी आदींची, तर पश्‍चिम महाराष्ट्रातून सुरेश खाडे, नगरमधून प्रा. राम शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.