गोंदिया दि. 26 (जिमाका) विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी 29 जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. लाखनी येथुन मोटारीने दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आगमन.जिल्ह्यात सन 1994 ते 2004 या कालावधीत स्थापन झालेल्या राईस मिल्सला नॉन ऍग्रीकल्चर (एन.ए) न मिळाल्यामुळे होणारे नुकसान दूर करण्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात वनजमीन पट्ट्यांबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी 4 वाजता फुलचुर नाका येथील प्रीतम लॉनमध्ये श्री वीरेंद्र जायसवाल यांच्याकडे आयोजित शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहून सोयीनुसार मोटारीने गोंदिया येथून नागपूरकडे प्रयाण करतील.





