देशवासीयांना समर्पित सानियाचे जेतेपद

0
7

वृत्तसंस्था
हैदराबाद – राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची मानकरी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने मायदेशात आगमन झाल्यानंतर आपले अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे जेतेपद देशवासीयांना समर्पित केले आहे.

माझ्या विरोधात कोण काय बोलतो याबाबीकडे मी लक्ष देत नाही. त्यांच्या तुलनेत माझ्या चाहत्यांची संख्या जास्त आहे. मी आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावण्याचा प्रयत्न करीत असते आणि त्याचा मला आनंद मिळतो. माझे सारे लक्ष माझ्या या चांगल्या कामगिरीकडेच लागले असते, असे सानिया एका विशेष मुलाखतीत बोलताना म्हणाली. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेआधी देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सानियाला प्रदान करण्यात आला होता. त्यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता. त्यावर सानियाने आपली वरील प्रतिक्रिया दिली. याआधीही माझे नाव अनेक वादांमध्ये ओढले गेले आहे. मात्र, मी त्याची कधीच पर्वा केली नाही व ते निराधारही ठरले होते, याचीही आठवण सानियाने यावेळी करून दिली.