तायक्वांडो स्पर्धेत युवराजसिंह महाविद्यालयाचे सुयश

0
30

गोंदिया दि.१८:जिल्हा तायक्वांडो असोसिशनच्यावतीने आमगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत तालुक्यातील ग्राम चुटिया येथील यूवराजसिंह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आकाश ठाकरे याने प्रथम तर सोनूसिंग कोडापे व आकाश तुरकणे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यातील आकाश ठाकरे याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व क्रीडा शिक्षक एन.बी.दुबे यांनी दिले आहे. त्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य के.डी.बोपचे, संस्था सचिव टेंभरे यांच्यासह अन्य शिक्षक व कर्मचार्‍यांनी कौतूक केले.