खुल्या कबड्डी स्पर्धेत संत गाडगेबाबा मंडळ प्रथम

0
7

यंग मल्टीपरपज सेंटरचे आयोजन
गोंदिया  दि. ११-: जीवनातील प्रत्येक टप्प्यात मानसाला स्पर्धेला सामोरे जावे लागते. या स्पर्धेत कधी विजय होतो, तर कधी पराजय. या दोन्ही परिस्थितीतून मानुस हा घडत जातो. क्रीडा स्पर्धेला ही बाब लागू आहे. अशा स्पर्धेतूनच ग्रामीण भागातील खेळाडूंना नैपुण्य दाखविण्याची संधी मिळते व ते पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यापर्यंत मजल मारतात. जिल्ह्यात खेळाडूंसाठी सोयीसुविधा व निधी उपलब्ध करण्यात येत असून यापासून भरीव कार्य होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते येथील यंग मल्टीपरपज सेंटरच्या वतीने रामनगर मनोहर म्युनिसिपल शाळेच्या पटांगणावर आयोजित ओपन कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी जि. प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भरत क्षत्रीय, विजयकुमार जायस्वाल, दीपक नशिने, नरेंद्र हालानी, विश्वनाथ सुखदेवे, गजानन नागदवने, भाउराव उके, प्रदिप ठाकूर, जयंत शुक्ला, शरद क्षत्रीय, केवलराम बादलवार, किरण नखाते, हाजी नईम सुफी, ताराचंद लांजेवार, एन. डी. डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू नितीन देशमुख, सचिन कटारे, उमेश कनोजे, अविनाश कटरे, राकेश यादव, योगेश बोरकर, संतोष समरीत, सुनील नेवारे, शुुभम गाते, ज्ञानेश्वर राउत, सुनील नेवारे, सोफिया मेश्राम, सीमा दिघोरे, शीतल अंबादे यांचा ना. बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा विजेता संघ गोंदिया संत गाडगेबाबा मंडळ ठरला. तर मॉ आदिशक्ती मंडळ खर्रा, वीर बजरंग क्रिडा मंडळ डोंगरगाव व वायएमसी गोंदिया हे अनुक्रमे व्दितीय, तृतीय व चतुर्थ बक्षीसाचे मानकरी ठरले. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून राकेश यादव, जितेंद्र पालांदूरकर, राजकुमार लामकासे, सौम्य चाचेरे, योगेश बोरकर यांची निवड करण्यात आली.
माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक सचिव सय्यद वहाब यांनी केले.  आयोजनासाठी पंकज बोरक, दामोदर शेंडे, नितीन पटले, दिनेश मस्करे, जितेंद्र घोटे, उमेश बैस, योगेश बोरकर आदींनी परिश्रम घेतले.