“वीर बिरसा मुंडा जयंती” दिना निमीत्ताने जिल्हास्तरीय “अहिंसा दौड १५ नोव्हेंबरला

0
21

गोंदिया,दि.08ः गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे  “वीर बिरसा मुंडा जयंती” दिना निमीत्ताने जिल्हास्तरीय “अहिंसा दौड १५ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्हयातील युवक- युवती यांच्यातील अष्टपैलू कलागुणांना वाव मिळावा, तसेच जनतेमध्ये पोलीस व प्रशासनाप्रती विश्वासाची आणि आपुलकीची भावना वाढावी या उद्देशाने पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे १५/११/२०२२ रोजी “वीर बिरसा मुंडा जयंती” दिना निमीत्ताने जिल्हास्तरीय “अहिंसा दौड Run For Non- Violence” मॅराथॉन स्पर्धा दि. १५/११/२०२२ रोजी सकाळी ०५.०० वा. जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे.

• सदर मॅरेथॉन स्पर्धेतील EVENT खालीलप्रमाणे आहेत
१) १८ वर्षावरील महिला/ पुरुषांकरीता २१ कि.मी.

२) १६ वर्षावरील महिला/पुरुषांकरीता १० कि.मी.

३) ४५ वर्षावरील महिला / पुरुष (सिनीयर सिटीझन) व आमंत्रित अतिथीकरीता ३ कि.मी. रन अॅण्ड वॉक,

सदर मैरेथॉन स्पर्धा ही क्रिडा संकुल राजाभोज चौक- रिंग रोड- पतंगा चौक पोलीस मुख्यालय- धिमरटोली- हिरडामाली (कोहमारा रोड) पर्यत या मार्गावर घेण्यात येणार आहे.

• सदर मैरेथॉन स्पर्धा दिनांक १५/११/२०२२ रोजी सकाळी ०५:०० वा. पासून ते १०:०० वा. पर्यंत होणे नियोजीत असल्याने आवश्यक सेवा वगळुन इतर वाहनांच्या रहदारी करिता प्रतिबंधित राहिल.

• सदर मॅरेथॉन स्पर्धेचे नोंदणी फार्म गोंदिया जिल्हयातील एकूण १६ पोलीस स्टेशन स्तरावर उपलब्ध आहेत.

• नोंदणी करिता अंतिम दिनांक ०९/११/२०२२ पर्यंत आहे.

मॅरेथॉन स्पर्धेचा STARTING AND FINISHING POINT जिल्हा क्रिडा संकुल, मरारटोली गोंदिया येथे राहील, •

स्पर्धेकरिता नक्षलग्रस्त भागातून येणाऱ्या खेळाडूंची दिनांक १४/११/२०२२ रोजी सायंकाळी राहण्याची व जेवणाची व्यवस्था जिल्हा क्रिडा संकुल, मरारटोली गोंदिया येथे करण्यात आली आहे. •तसेच
दिनांक १५/११/२०२२ रोजीच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या सहभागी खेळाडूं करीता पिण्याच्या पाण्याची व फुड पैकेट ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

• मॅरेथॉन स्पर्धेतील EVENT नुसार प्रथम ते दहाव्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षीस व मेडल देण्यात येईल.

दिनांक १५/११/२०२२ रोजीच्या “वीर बिरसा मुंडा जयंती” दिनानिमीत्ताने “अहिंसा दोड Run For Non- Violence” मॅराथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.