मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील विद्यार्थ्याची बॅडमिंटन स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

0
16

गोरेगांव. :– स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील विद्यार्थ्यानी तालुका स्तरावर आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम प्रथम क्रमांक पटकावून आपली निवड जिल्हास्तरावर केली आहे. विजयी झाल्याबद्दल शाळेचे संस्थापक आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले, प्राचार्या सौ. सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक एस. डी. चीचामे, यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. तसेच सर्व शिक्षकांनी विजयी विद्यार्थी तसेच क्रीड़ा शिक्षक आशीष रामटेके यांचे अभिनंदन करून कौतुक केले. विजयी विद्यार्थ्यां डावीकडून वैष्णवी मडावी, तनुश्री हनवते, तृप्ती दानी, आलिशा रहांगडाले, प्रशिका रामटेके यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रीड़ा शिक्षक, शाळा संस्थापक, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद व शाळेला दिले..