सर्वात रोमहर्षक फायनल:अर्जेंटिना चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव, 20 वर्षांनंतर चषक युरोपबाहेर

0
7

अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता बनला आहे. गतविजेत्या फ्रान्सला ३-३ च्या बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवत ३६ वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अर्जेंटिनाच्या मेसीने पेनल्टीवर पहिला गोल केला. दुसरा एंजेल डी मारियाने केला. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये किलियन एमबापेने ९७ सेकंदांत २ गोल केले. सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला. पहिल्या १५ मिनिटांत एकही गोल झाला नाही, पण पुढच्या १५ मिनिटांत मेसीने गोल करत अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. मग एमबापेने पेनल्टीवर गोल करत सामना ३-३ ने बरोबरीवर आणला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना जिंकला. अशा प्रकारे फुटबॉलमधील युरोपची जादूही २० वर्षांनंतर ओसरली. चषक युरोपच्या बाहेर गेला.

सद्दी मेसीची, पण भविष्य एमबापेचे
३५ वर्षीय मेसीने करिअरमध्ये सर्वात मोठी ट्रॉफी जिंकली. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून तो वरचढ राहिला. आता तो निवृत्ती घेत आहे. दुसरीकडे, केवळ २ वर्ल्डकपमध्ये १२ गोल करणारा एमबापे सध्या २४ वर्षंाचा होणार असल्याने किमान ३ वर्ल्डकप खेळू शकतो. हा वेग राहिल्यास सर्वात यशस्वी खेळाडू बनू शकतो.

मात्र जगाची ४% लोकसंख्याच बादशहा
आजवर २२ वर्ल्डकपमध्ये १२ वेळा युरोपचे ५ देश जिंकले. जर्मनी(४ वेळा), इटली (४), फ्रान्स (२), इंग्लंड (१), स्पेन (१). या देशांत एकूण ३४ कोटी लोकसंख्या आहे, जी जगाच्या ७७० कोटींच्या ४% आहे. दक्षिण अमेरिकी देश एकूण १० वेळा विजेते झाले. ब्राझील(५ वेळा), अर्जेंटिना (३ वेळा), उरुग्वे (२ वेळा). या दृष्टीने ब्राझील सर्वात जास्त चॅम्पियन ठरला. मात्र २००२ नंतर यश नाही.

गोल्डन बॉल
लियोनेल मेसी अर्जेंटिनाला करिअरचा पहिला वर्ल्डकप मिळवून दिला. स्पर्धेत ७ गोल केले.

गोल्डन बूट
किलियन एमबापे फायनलमध्ये हॅट््ट्रिकसह स्पर्धेमध्ये ८ गोल केले.

गोल्डन ग्लोव्ह्ज
एमी मार्टिनेज, बेस्ट गोलकीपर, पेनल्टी शूटमध्ये फ्रान्स संघाला ४-२ वर रोखले.

अर्जेटिनाचा कर्णधार आणि फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अखेर साकार झाले. रविवारी झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर ४-२ अशी सरशी साधताना अर्जेटिनाने तिसऱ्यांदा विश्वविजेते म्हणून मिरवण्याचा मान मिळवला.

 अर्जेटिनाचे हे तिसरे विश्वविजेतेपद ठरले. त्यांनी १९७८ व १९८६मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.

 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणारा एम्बापे केवळ दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी इंग्लंडच्या जेफ हस्र्ट यांनी १९६६ मध्ये पश्चिम जर्मनीविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

सर्वाधिक विश्वचषक जिंकणारे संघ

ब्राझील :       ५ (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२)

जर्मनी :        ४ (१९५४, १९७४, १९९०, २०१४)

इटली :        ४ (१९३४, १९३८, १९८२, २००६)

अर्जेटिना :     ३ (१९७८, १९८६, २०२२)

गोल्डन बूट (सर्वाधिक गोल)

किलियन एम्बापे (फ्रान्स) :        ८

लिओनेल मेसी (अर्जेटिना) :      ७

ज्युलियन अल्वारेझ (अर्जेटिना) :  ४

ऑलिव्हिएर जिरूड (फ्रान्स) :      ४

पेनल्टी शूटआऊट

    फ्रान्स                   अर्जेटिना            

किलियन एम्बापे ✓   (१-१)   लिओनेल मेसी   ✓

किंग्सले कोमान  ✘    (१-२)   पाव्लो डिबाला    ✓

टिचोआमेनी     ✘   (१-३)   लिआंड्रो पेरेडेस    ✓

कोलो मुआनी    ✓   (२-४)   गोन्झालो मोन्टिएल ✓