सहा राष्ट्रीय शालेय क्रीड़ा स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्रकड़े

0
8

गोदिंया,दि. ७ – स्कूल गेम फेडरेशन ऑफ़ इंडियाच्या वतीने घेण्यात येणार असलेल्या 62 व्या राष्ट्रीय शालेय क्रीड़ा स्पर्धा 2016-17 चा वार्षिक कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला. यावर्षी महाराष्ट्र कड़े सहा स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. या मधेय पुणे व् कोल्हापुर, नासिक व् लातूर जिल्ह्याला स्पर्धा आयोजनचा मान मिळाला आहे.
पुणे येथे 17 वर्षाआतील मुले व् मुलींच्या गटातील राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात येतील. तसेच 19 वर्षा आतील एथलेटिक्स स्पर्धा पुणे येथेच डिसेंबरच्या शेवटी होतील.तर कोल्हापुर जिल्ह्याला कबड्डी स्पर्धा आयोजनची जबाबदारी देण्यात आली. कोल्हापुरला 19 वर्षाआतील मुले व् मुलींच्या गटातील कबड्डी स्पर्धा होतील. दोन्ही स्पर्धा नोव्हेंबर च्या चवथ्या आठवड्याला होतील. नासिक येथे 14 वर्षाआतील मुले व मुली गटामध्ये बॅडमिंटन स्पर्धा होतील. लातुरला नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्याला 17 व् 19 वर्षाआतील मुले व् मुलींच्या गटातील सायकलिंग स्पर्धा होतील.