28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home क्रीडा के.पी.असाटी पब्लिक शाळा पालडोंगरी तिरोडा येथे तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

के.पी.असाटी पब्लिक शाळा पालडोंगरी तिरोडा येथे तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

0
24

चित्रा कापसे/तिरोडा–तालुक्यातील के.पी.असाटी पब्लिक शाळा पालडोंगरी येथील भव्य खेळ मैदानात खेळ आणि तरुण सेवा संघ पुणे,जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत आंतर १७ वर्षीय आणि आंतर १४ वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांचे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये मुले आणि मुली यांच्या चमूचा समावेश होता.या स्पर्धेत अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.जसे.. मेरीटोरीयस पब्लिक शाळा तिरोडा, के.पी.असाटी पब्लिक शाळा पालडोंगरी,एस.डी.बी.विद्यालय खैरबोडी,शहिद मिश्रा विद्यालय तिरोडा,अशा अनेक शाळेच्या चमुंनी सहभाग घेतला होता.

या तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटक के.पी.असाटी पब्लिक शाळेचे प्राचार्य सुरेश उपाध्याय यांनी केले.उद्घाटनाचा सामना म्हणून आंतर १७ वर्षीय वयोगटातील शहीद मिश्रा विद्यालय तिरोडा आणि के.पी. असाटी पब्लिक शाळा पालडोंगरी यांच्यात लढत झाली.या सामन्यामध्ये शहीद मिश्रा विद्यालयाच्या चमूनी ५-० नी विजयी झाले.त्यासह एस.डी.बी.विद्यालयाच्या चमूशी अंतिम सामना(फायनल मॅच) सुद्धा विजयी झाले.तसेच के.पी.असाटी पब्लिक शाळेच्या १४ वर वयोगटातील मुलींच्या चमूनी आदर्श भारत पब्लिक शाळेच्या (छावा)लढतीत अंतिम सामना (फायनल मॅच)जिंकून प्रथम क्रमांक पटकावला.खेळ शिक्षक श्रीकांत लांजेवार (के.पी.असाटी पब्लिक शाळा पालडोंगरी)अमन नंदेश्वर खेळ शिक्षक(एस.डी.बी.विद्यालय)शैलेश बघेले(शहीद मिश्रा विद्यालय)निखिल शेंडे आणि मुकेश शेंडे (मेरीटोरियस पब्लिक शाळा तिरोडा)यांनी ही संपूर्ण फुटबॉल स्पर्धा यशस्वी करण्यात अथक परिश्रम घेतले.विद्यालयाचे संचालक संस्कार असाटी,प्राचार्य सुरेश उपाध्याय आणि सर्व मान्यवर शिक्षक यांनी विजेत्या आणि उपविजेत्या चमूना अभिनंदन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.