24.4 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home राजकीय शिवसेना युवा लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांचा भाजपात प्रवेश

शिवसेना युवा लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांचा भाजपात प्रवेश

0
118

भंडारा :- भंडारा  युवा शिवसेना लोकसभा प्रमुख व आ. नरेंद्र भोंडेकर यांचे खंदे समर्थक जॅकी रावलानी व भंडारा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष भगवान बावणकर यांनी शुक्रवार दि. १० ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला.आज भंडारा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांनी त्यांना भाजपात अधिकृत प्रवेश दिला.

blank

जॅकी रावलानी हे आ. नरेंद्र भोंडेकर यांचे उजवे हात समजले जात होते. ते युवा शिवसेना भंडारा लोकसभा प्रमुख होते. विश्व हिंदू परिषदेचे भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत. जॅकी रावलानी यांच्या नाराजीचा फायदा घेत  आ. डॉ. परिणय फुके यांनी जॅकी रावलानी यांच्या पत्नीला भाजपची उमेदवारी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रावलानी यांनी काल मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. परिणय फुके’ यांच्या उपस्थितीत भाजपाचा दुपट्टा खांद्यावर घेतला. त्यांच्या सोबतच भंडारा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष भगवान बावणकर यांनी सुद्धा भाजपात प्रवेश घेतला. यावेळी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

blank