सायना मलेशिया ‘मास्टर’

0
9

सरावक , दि. 22 – भारताची फुलराणी सायना नेहवालने आज पुन्हा एकादा बॅडमिंटनच्या कोर्टवर कमाल करताना मलेशिया मास्टर्सच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगला सरळ गेममध्ये 22-20, 22-20 असे पराभूत केले.
या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या सायनाने अंतिम लढतीतही जबरदस्त खेळ केला. तिने थाई खेळाडूला कोणतीही संधी न देता पहिला गेम 22-20 ने जिंकला. त्यानंतर सायनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमनाची कोणतीही संधी न देता दुसरा गेमही 22-20 ने खिशात घालत सामन्यासह विजेतेपदावर नाव कोरले.