राज्यातील क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य तालुकास्तर व जिल्हास्तरीय चाचणीचे आयोजन

0
30

नागपूर, दि. 15 : शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक
सेवा संचालयाद्वारा राज्यातील 11 क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशाकरिता क्रीडा
नैपुण्य तालुकास्तर व जिल्हास्तरावरील चाचण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुकास्तरीय चाचणी 17 व 18 फेब्रुवारी रोजी सर्व तालुका मुख्यालयात आणि
जिल्हास्तरावरील चाचणी 22 व 23 फेब्रुवारीला मानकापूर येथील क्रीडा
प्रबोधनीत घेण्यात येईल.
तालुक्यातील व जिल्ह्यातील 8 ते 14 वर्ष वयोगटातील इच्छूक शालेय
विद्यार्थी, शाळाबाह्य विद्यार्थी मुला मुलींनी क्रीडा नैपुण्य
चाचण्यांकरिता नियोजित दिनांक व वेळी जन्मतारखेच्या अधिकृत पुराव्यासह
क्रीडा पोशाखात उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता राज्य क्रीडा
मार्गदर्शक पवन मेश्राम (9860404196), अरूण बुटे (9422802104), योगेश
खोब्रागडे (9326915209), श्रीमती उज्वला लांडगे (9764732768) यांच्याशी
संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले
आहे.