जलतरण तलावावर पोहण्याचा आनंद लुटा

0
11

गोंदिया,दि.६ : जलतरण हा परिपूर्ण असा व्यायाम आहे. या व्यायामामुळे हृदयाला मजबुती देणे आणि त्याचबरोबर सर्व तणावातून शरीराला मुक्ती देणारा, मनाला सशक्त बनविणारा व्यायाम म्हणजे जलतरण होय. जिल्हा क्रीडा संकुल समिती गोंदिया वतीने मरारटोली गोंदिया येथे असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. या जलतरण तलावात प्रवेशासाठी सदस्यत्व शुल्क ५० रुपये, नोंदणी शुल्क १५० रु., गेस्ट तिकीट १०० रु., प्रशिक्षण शुल्क प्रतिमहा २०० रु., इतर सभासदासाठी प्रति मासिक जलतरण शुल्क ६०० रु., त्रैमासिक जलतरण शुल्क १७०० रु., सहामाही जलतरण शुल्क ३३०० रु. असे आहे, तर १८ वर्षाखालील खेळाडू पुरुष/महिलांसाठी प्रति मासिक जलतरण शुल्क ४०० रु., त्रैमासिक जलतरण शुल्क ११०० रु., सहामाही जलतरण शुल्क २१०० रुपये आहे.जलतरणाचा लाभ घेण्याकरीता अनिल पांडे मो.९९२३७५२३६६, संजय बाटवे मो.९५९५३६००५४, नाजुक उईके मो.९०४९३३९९६६ यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा संकुल समिती गोंदिया द्वारे करण्यात येत आहे.