फूटबॉल सेल्फी पॉईंटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

0
15

मुंबई, दि. 7 : जागतिक महासंघांची (फिफा) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात देशात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आज मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फूटबॉल सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे स्वत: फोटो काढले. मंत्रालयात सुरु करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्यासह सर्वांनी शुभेच्छा दिल्या. मंत्रालयातील
अधिकारी-कर्मचारी, येणारे अभ्यागत या सेल्फी पॉईंटला आवर्जून भेट देत होते.यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आदी उपस्थित होते.