आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पध्रेत प्रोग्रेसिव्ह शाळेचे सुयश

0
15

गोंदिया,दि.13ः- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेच्या वतीने आयोजित आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विभागीय स्तरासाठी आपले स्थान सुनिश्‍चित केले आहे.ज्यामध्ये सुधांशू भांडारकर, पल्लवी भांडारकर यांची निवड झालेली असून पुढील आयोजित होणार्‍या विभागीयस्तरीय आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व करतील.
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील व श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉ.पंकज कटकवार, सचिव डॉ.एन.आर. कटकवार यांना दिले. प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, कुलदीप भौतिक, अभय गुरव, विणा कावळे, कृष्णा चव्हाण, निधी व्यास, मिनाक्षी महापात्रा, विकास पटले, राहुल रामटेके, दिव्यांशू जैस्वाल, प्रमोद वाडी, शिल्पा सिंग, कल्याणी रहांगडाले, वर्षा सतदेवे, तोमेश पारधी, क्रीडा अध्यापिका ज्योती पहिरे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यानी अभिनंदन केले.