मामा तलावाचे नुतनीकरण व दुरुस्ती करा

0
19

आल्लापली,दि.13– सिरोंचा तालुक्यातील मेडारम ग्राम पंचायत हद्दीत येत असलेल्या तमंदाला येथील मामा तलावाचे नूतनीकरण करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मुरलीक्रिष्णा कासर्लावार, मारगोनी सत्यनारायण, प्रभाकर कोत्तागट्टू, वेमुला रमनय्या, कुम्मरी बापू, बोद्यांलू रंगुवार, ब्रम्हानंदम कोत्तागट्टू, कुम्मरी श्रीनिवास, गड्डम मदनय्या आदी शेतकºयांनी माजी आमदार दीपक आत्राम व जि. प. उपाध्यक्ष अजय कांकडालवार यांना निवेदनातून केली आहे.

निवेदनात शेतकºयांनी म्हटले आहे की, या तलावाखाली जवळपास शंभर एकर शेतजमीन असून तलावाचे नूतनीकरण व दुरुस्ती आवश्यक आहे. तलावाची दुरुस्ती न केल्याने तलावात कमी प्रमाणात पाण्याची साठवणूक होत आहे. त्यामुळे शंभर एकर शेतजमीन अनेक वर्षापासून कोरडा पडलेला आहे . या  तलावाच्या दुरुस्तीचे काम या पूर्वी नरेगा या योजनेत मंजूर असून नोंदणीकृत मजूर या कामासाठी येत नसल्याने  या तलावाची नूतनीकरण आणि खोलीकरण व दुरुस्तीसाठी  स्वतंत्र निधी  मंजूर करून  तलावाची स्वतंत्र  यंत्रणा किंवा कंत्राटदारमार्फत  खोलीकरण , गेट बांधकाम, वेस्टवेहर दुरुस्ती, तलावाची पूर्णत: दुरुस्ती  केल्यास शंभर एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे, असे निवेदनात शेतकºयांनी म्हटले आहे. यावेळी जि.प.सदस्या अनिता आत्राम, जि. प. महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या  जनगाम , पं. स. सदस्या शकुंतला जोडे , आविस सल्लागार मंदा शंकर, बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव,  सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लमवार, पेंटीपाकाचे उपसरपंच कुम्मरी सडवली, सूंकरेल्ली सरपंच चौधरी, सिरकोंडाचे उपसरपंच लक्ष्मण गावडे, मारान्ना इंगीली, समय्या, गादे सोमय्या, मारोती गणपुरापू, किरणकुमार वेमुला, तिरुपती दुर्गम, श्रीशैलम मोरला, श्याम बेज्जनींवार, ओमकार ताटीकोंडावार, नागराजू इंगीली, येदुरु समय्या, जनगाम सडवली, नरेश धर्मी, लक्ष्मण बोल्ले यांच्यासह आविसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.