वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी पराभव

0
6

सिडनी, दि. २७ – दक्षिण आफ्रिकेविरुध्द वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी पराभव करीत आफ्रिकेने विश्वचषकातील सर्वात मोठा विजय नोंदवला.

ए.बी.डिव्हिलियर्सने अवघ्या ६६ चेंडूत केलेल्या १६२ धावांच्या जोरावर आफ्रिकेने विश्वचषकातील आत्तापर्यंतची दुस-या क्रमांकाची सर्वौच्च धावसंख्या उभारली. सिडनी क्रिकेट मैदानावर आफ्रिकन फलंदाजांनी अफलातून फलंदाजी करीत ४००चा टप्पा ओलांडला.आफ्रिकन संघाने ५ गडी गमावून वेस्ट इंडिज संघासमोर विजयासाठी भल्यामोठया ४०९ धावसंख्येचे आव्हान ठेवले. आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. सलामीला आलेला कॉक्‍ १२ धावावर बाद झाला परंतू त्यानंतर आलेल्या आमलाने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हमला चढवला. हाशिम आमलाने ६५, ड्यू प्लेसिस ६२, रोस्सो ६१, मिल्लर २०, आणि ए.बी.डिव्हिलियर्सने केलेल्या नाबाद १६२ धावांच्या जोरावर आफ्रिकन संघाने ५० षटकात ५ गडी गमावून ४०८ धावा केल्या.

विश्वचषकाच्या साखळी फेरीतच वेस्ट इंडिजला तब्बल ४०९ धावांचे आव्हान समोर आल्यानंतर विंडिजची सुरूवात आक्रमक होईल हा समज चुकीचा ठरला. सलामीला आलेल्या ख्रिस गेलला अवघ्या ३ धावांत बाद करीत आफ्रिकन गोलंदाजांनी विंडिजला पहिला धक्का दिला. वेस्ट इंडिजकडून जो होल्डरने सर्वाधिक ५६ धावा केल्या. स्मीथ ३१, सॅम्यूअल्स ००, कार्टर १०, रामदीन २२, सिमन्स ००, सॅमी ०५, रसेल ००, बेन ०१, जे टेलरच्या नाबाद १५ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजला केवळ १५१ धावाच करता आल्या. विंडिजच्या फलंदाजांना सूर न गवसल्याने त्यांना विश्वचषकातील २५७ धावांनी अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेकडून सर्वाधिक इमरान ताहिरने सर्वाधिक ५ गडी बाद केले तर एबोट, मार्कोलने प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश मिळवले तर स्टेनला १ गडी बाद करता आला