किरसान मिशन शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

0
13

गोरेगाव,दि.27ः-स्थानिक किरसान मिशन शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी चिराग भानारकर यांनी व्हर्डलर स्पर्धेत जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकाविला. दरम्यान त्याची विभागीत स्पधेर्साठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.एन.डी.किरसान व प्राचार्य डॉ.विनोद उके यांनी पुष्पगुच्छ देऊन चिरागचे अभिनंदन केले. यावेळी शाळेचे अतिरिक्त प्रभारी श्रीमती गीता जगनीत, शिक्षिका श्रीमती चौरसिया, डोहळै, गोधुळे, साठवणे, रहांगडाले, चिपे, सोनवाने, जांभुळकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांने आपल्या यशाचे आई-वडील व शिक्षकांना दिले. यशाबद्दल शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी चिरागचे कौतुक केले.