महाराष्ट्र अंनिसचे फटाकेमुक्त दिवाळी अभियान

0
9

गोंदिया,दि.27ः- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्पेष्ठ फटाकेमुक्त दिवाळी अभियानाच्या प्रचारासाठी सहा महिला कार्यकर्त्यांची बाईक रॅली गोंदियात ४ ऑक्टोबरला सायंकाळपयर्ंत येणार असून ५ऑक्टोबरला शाळा-महाविद्यालयात प्रबोधन करणार आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेल्या ३0 वर्षांपासून विवेकवादी चळवळ म्हणून कार्यरत आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम व मोहीम विविध विषयावर राबवित आहे.
समितीच्या गोंदिया शाखेने दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर पयर्ंत नागपूर विभागातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर येथील शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फटाके फोडल्यानंतर होणारे दुष्परिणाम याबद्दल वैज्ञानिक माहिती देणार आहे. या अभियानात महाराष्ट्र अंनिसच्या वर्धा जिल्हा शाखेच्या िजल्हा प्रधान सचिव सारिका डेहनकर, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रमुख डॉ.माधुरी झाडे, तसेच कविता राठोड,पंकजा गादेवार, प्रतिभा ठाकूर आणि कविता लोहट या सहा कार्यकर्त्यांची टू-व्हीलर प्रबोधन यात्रा सहा जिल्ह्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी या अभियानास सहकार्य करावे अशी विनंती गोंदिया जिल्हा शाखाध्यक्ष माणिक गेडाम, कार्याध्यक्ष विनोद बन्सोड, जिल्हा प्रधान सचिव डॉ.सविता बेदरकर, युवा सहभाग सचिव अँड.अमित उके, उपाध्यक्ष डी.टी.कावळे, रमाकांत खोब्रागडे, डॉ.माधवराव कोटांगले, मीडिया सेल प्रमुख पल्लवी रामटेके, अनिल गोंडाने आदिंनी केली आहे.