भारताचा 8 गडी राखून विजय

0
20

हैमिल्टन – आयर्लंडने ठेवलेले 260 धावांचे आव्हान 13 षटके आणि 8 गडी राखून पूर्ण करत भारतान विश्वचषक स्पर्धेतील सलग पाचवा विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनने सलामीला केलेल्या 174 धावांच्या पायाभरणीनंतर विराट आणि अजिंक्य राहणे यांनी विजयी कामगिरी पूर्ण केली. धवनने शतक तर रोहितने अर्धशतक पूर्ण केले. या विजयाने धोनीने विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवण्याचा सौरव गांगुलीचा विक्रम मागे टाकला आहे.भारताच्या रोहित आणि शिखरने सुरुवातीची दोन तीन षटके तर अत्यंत संयमात खेळली. त्यानंतर खराब चेंडू आला तर त्याला टोलवण्याचे काम करत धावा जमवणे सुरू ठेवले. शिखर धवनने फटकेबाजी सुरू केली आहे. तर रोहितही काही चांगले फटके लगावत आहे. दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली. दोघांनीही फटकेबाजी सुरू केली होती. पण 64 धावांवर असताना थॉमसनने रोहित शर्माचा त्रिफळा उडवला. शिखर धवनने मात्र स्पर्धेतील दुसरे शतक पूर्ण केले. त्याने 84 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने शतकी खेळी केली. पण शतक होताच तोही बाद झाला. विराट कोहली आणि अजिंक्य राहणे यांनी विजयी कामगिरी पूर्ण केली.भारताने या सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. मात्र गेल्या चार सामन्यांच्या तुलनेत भारतीय गोलंदाजीची धार न्यूझीलंडच्या मैदानावर कमी झाल्याची दिसली. आयर्लंडच्या दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. सलामीसाठी दोघांनी 89 धावांची भागीदारी केली. दोघांनीही भारतीय गोलंदाजीचा संयमाने सामना केला. स्टर्लिंग 42 धावांवर बाद झाला. तर पोर्टरफिल्ड सध्या खेळत आहे. भारताला पंधराव्या षटकांत पहिली विकेट मिळाली. आर अश्विनने स्टर्लिंगला बाद केले. त्यानंतर सुरेश रैनानेही जॉयसला बाद केले. पण पुन्हा पोटरफिल्ड आणि ब्रायनने चांगली फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती. पण त्यानंतर धोनीने मोहीतच्या हाती चेंडू देताच पोर्टरफिल्ड 93 चेंडूत 67 धावा करून बाद झाला. त्यानंतर अश्विनने बलबिर्नीचा बळी घेतला. त्यानंतर शमीने ब्रायन आणि जडेजाने विल्सनला बाद केले. त्यानंतर यादवने डॉकरेल तर शमीने क्युसॅकचा बळी घेतला.

आयर्लंडने जिंकला टॉस
आयर्लंडने भारताच्या विरोधात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने स्पर्धेतील यापूर्वी सर्व सामने जिंकत ग्रूपमध्ये अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा भारताच्या स्थानावर काहीही परिणाम होणार नाही. आयर्लंडसाठी मात्र हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकल्यास ते थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. मात्र भारताचा उपांत्य फेरीतील सामना न्यूझीलंडबरोबर होणार आहे. हा सामना न्यूझीलंडमध्येच होईल. त्यामुळे न्यूझीलंमडमधील खेळपट्ट्यांचा सराव होण्याच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी अत्यंत म्हत्त्वाचा ठरणार आहे.