24 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home क्रीडा भाजयुमोच्यावतीने 25 डिसेंबरला ‘अटल मॅरेथॉन’

भाजयुमोच्यावतीने 25 डिसेंबरला ‘अटल मॅरेथॉन’

0
23

गोंदिया,दि.13ः- गोंदिया जिल्हा भारतीय जनता युवामोर्चा द्वारा येत्या 25 डिसेंबरला ‘अटल मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजयुमो अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनी दिली आहे.ही स्पर्धा मूर्री रोड ते कालेखाँ चौक (11 किमी) मार्गावर होणार असून 25 डिसेंबर 2018 ला सकाळी 6 वाजता स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे.या स्पर्धेतील विजेत्याला प्रथम पुरस्कार 21,000,द्वितीय पुरस्कार 11,000,तृतीय पुरस्कार 7,000,चतुर्थ पुरस्कार 5,000 रुपये व  5 ते 10 क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला 1,100 रुपये पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात येणार असून निशुल्क ऑनलाईन नोंदणीसाठी  www.bjymgondia.in किंवा आमचे अँड्रॉइड अँप BJYM Gondia  वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.